शेतकऱ्यांना हमीभाव, तरुणांना नोकऱ्या हव्या, पण या देशात ऐकतो कोण? राहुल गांधी यांचा हल्ला
शेतकऱयांना किमान हमीभाव हवा आहे, तरुणांना नोकऱया हव्या आहेत, महिलांना महागाईपासून दिलासा हवा आहे, पण या देशात त्यांचे ऐकतो कोण, असा जबरदस्त हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चढवला.
आज देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी, महागाईचा प्रश्न अशी दारुण परिस्थिती आहे. कुणालाही विचारा, पण सरकारमधील कुणाला वेळ कुठे आहे? ही निवडणूक मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि खुल्या प्रवर्गातील गरीबांचं भवितव्य ठरवणारी आहे. देशाची घटना, लोकशाहीच्या रक्षणासाठी ही लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List