बोपण्णा-एब्डन, सुमित नागल यांचे आव्हान समाप्त

बोपण्णा-एब्डन, सुमित नागल यांचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था /माँटेकार्लो

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटेकार्लो मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. या स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचा सामना पावसामुळे तात्पुरता थांबवण्यात आला होता पण त्यानंतर त्याला या लढतीत व्होल्गर रुनेकडून हार पत्करावी लागली. पुरुष दुहेरीच्या सामन्यात क्रोएशियाचा पेव्हिक आणि एल साल्वादोरचा मार्सेलो अॅरेव्हेलो यांनी भारताच्या रोहन बोपण्णा आणि एब्डन यांचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला.या स्पर्धेत पावसामुळे भारताच्या सुमित नागलचा सामना काही वेळ थांबवण्यात आला होता पण त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या या सामन्यात सातव्या मानांकित रुनेने सुमित नागलचे आव्हान 6-3, 3-6, 6-2 असे संपुष्टात आणत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. क्ले कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील हा सामना 150 मिनिटे चालू होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;