शिव आरोग्य सेना रुग्णाच्या मदतीला धावली

शिव आरोग्य सेना रुग्णाच्या मदतीला धावली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते दिवाकर रावते व शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या हस्ते आणि शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार गरजू आणि दुर्धर आजारग्रस्त रुग्ण लक्ष्मीबाई गायकवाड (73), धाराशीव, माजड यांना कोलोस्टोमी बॅगसह चार महिन्यांना पुरणारे आरोग्य किट उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू सकपाळ, मुंबई जिल्हा सह समन्वयक प्रकाश वाणी यांनी तातडीने पाठपुरावा करून शिव आरोग्य सेना व हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हरयाणा राज्यातून सदर किट मागवले. शिवसेना भवन-दादर येथे रुग्णाचे नातेवाईक आप्पा गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना संघटक विलास रुपवते, डॉ. प्रशांत भुईंबर, एकनाथ अहिरे, सचिन त्रिवेदी, अझीम शेख आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;