उद्धव ठाकरे यांची आज बोईसरमध्ये जाहीर सभा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शुक्रवार 12 एप्रिल रोजी पालघरमध्ये धडाडणार आहे. महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बोईसरच्या पास्थळ येथील आंबटगोड मैदानावर सायंकाळी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे. प्रचाराचा पहिला नारळ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण्यात येणार असून या सभेची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे.
महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवार म्हणून भारती कामडी पालघर लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहेत. मिंध्यांच्या गद्दारीनंतरही भारती कामडी या ठामपणे शिवसेनेसोबत राहिल्या. निष्ठावंत ‘संघर्षकन्या’ अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड चैतन्याचे वातावरण आहे. बोईसरच्या पास्थळ येथील आंबटगोड मैदानावर होणाऱया या सभेसाठी पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List