चीनविषयी पंतप्रधानांची विधाने बुळचट, मुळमुळीत; काँग्रेसने मोदींना धारेवर धरले
‘न्यूजवीक’ या आंतरराष्ट्रीय साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुळमुळीत विधाने केल्याबद्दल आज काँग्रेसने मोदींना धारेवर धरले. भारतात कुणीही घुसखोरी केलेली नाही किंवा कुठलीही चौकी ताब्यात घेतलेली नाही या जून, 2020 मध्ये केलेल्या निवेदनाबद्दल 140 कोटी देशवासीयांची मोदींनी माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
मोदींना या मुलाखतीतून चीनला एक सडेतोड उत्तर देण्याची संधी होती. मात्र, जे बुळचट उत्तर दिले त्यामुळे भारतीय भूभागावर दावा सांगणाऱया चीनला आणखी जोर मिळण्याचीच शक्यता आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List