मोदी हे संघाच्या मानगुटीवरील भूत! प्रकाश आंबेडकर यांची टीका

मोदी हे संघाच्या मानगुटीवरील भूत! प्रकाश आंबेडकर यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवले आहे. मागच्या सहा महिन्यांत सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव कुणी वर्तमानपत्रात वाचले का? मोदी गेल्या पाच वर्षांत संघ मुख्यालयात आले का? हे स्पष्ट आहे की, मोदी यांनी संघ संपवला, झेंडा संपवला. मोदी हे संघाच्या मानेवरील भूत आहे, अशी जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी हेदेखील स्वतःहून नागपूर येथील संघ कार्यालयात यायचे, पण मागच्या पाच वर्षांत मोदी एकही दिवस संघ कार्यालयात आलेले नाहीत. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितला, तेव्हा त्यांना वेळही देण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला संपविले आणि भाजपालाही संपवले. निवडणुकीला आवश्यक आहे म्हणून केवळ चिन्ह तेवढे ठेवले आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

मोदींचे त्यांच्या मानगुटीवर बसलेले हे भूत खाली उतरवायचे की नाही हे आता संघाने ठरवावे. आम्ही त्यासाठी काम करत आहोत. मोदींचे हे भूत उतरविण्यासाठी आम्ही तयार आहोत. तशी सुरुवातही आम्ही केली आहे. त्यासाठी संघाने आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

मोदी सरकार वसुलीखोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे वाटोळे केले असून इलेक्टोरल बॉण्ड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. पेंद्रातील मोदी सरकार हे वसुलीखोर सरकार आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

एका बाजूला चीन आणि दुसऱया बाजूला पाकिस्तान भारताच्या छातीवर बसत आहेत. आपले जवान शहीद होत आहेत. मात्र, असे असताना भारतीय जनता पक्ष ‘अबकी बार 400 पार’चा नारा देत आहे. मात्र, त्यांचे 104 देखील खासदार निवडून येणार नाहीत.

व्यापाऱयांनी भाजपला कितीही पैसे दिले तरी, मत देऊ नये. नाहीतर तुमच्या घरी ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्याशिवाय राहणार नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;