अभिनेत्रींचे घडय़ाळ मोलकरणीने लांबवले 

अभिनेत्रींचे घडय़ाळ मोलकरणीने लांबवले 

छोटय़ा पडद्यावर काम करणाऱया अभिनेत्रीचे 8 लाख रुपये किमतीचे घडय़ाळ तिच्या मोलकरणीने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी मोलकरणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्रीच्या घरी कामासाठी एका एजन्सीच्या माध्यमातून महिला ही घरकामासाठी आली होती. फेब्रुवारीत अभिनेत्रीने मीटिंगसाठी ते घडय़ाळ घातले होते. त्यानंतर ते घडय़ाळ कपाटात ठेवले होते. मार्च महिन्यात अभिनेत्री घरी होती. तेव्हा ती मोलकरीण कपडे सुकत टाकण्याच्या नावाखाली गॅलरीमध्ये काही तरी लपवत असताना दिसली. तेव्हा अभिनेत्रीने तिला जाब विचारला. दोन तासांनी ती अभिनेत्रीजवळ आली. आई आजारी असल्याने तत्काळ गावी जावे लागेल असे तिने अभिनेत्रीला सांगितले. मोलकरणीने विनंती केल्यानंतर अभिनेत्रीने तिला गावी जाण्यास परवानगी दिली. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीला एका इव्हेंटसाठी घडय़ाळ घालायचे होते. तिने कपाट उघडले तेव्हा घडय़ाळ चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अभिनेत्रीने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;