पोलीस भरतीत सवलत देण्यास मिंधे सरकारचा नकार

पोलीस भरतीत सवलत देण्यास मिंधे सरकारचा नकार

तृतीयपंथींना पोलीस भरतीत सवलत द्यावी, मॅटने मिंधे सरकारला दिले आहेत. त्याविरोधात मिंधे सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने दोन तृतीयपंथींना नोटीस जारी केली आहे.

न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने ही नोटीस जारी केली आहे. मिंधे सरकारच्या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने आर्या पुजारी व विनायक काशीद यांना दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 25 एप्रिलला होणार आहे.

मॅटचे आदेश

कट ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी या दोघांना ग्रेस मार्क द्या अथवा एकूण गुणांच्या 50 टक्के गुण या दोघांना मिळाले असल्यास त्यांची निवड करावी, असे आदेश मॅटने शासनाला दिले. त्याविरोधात मिंधेंनी याचिका दाखल केली.

काय आहे प्रकरण

काशीद व आर्या यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. काशीद यांना शारीरिक चाचणीत 35 तर लेखी परीक्षेत 54 गुण मिळाले. त्यांना एकूण गुण 89 मिळाले. आर्या यांना शारीरिक चाचणीत 39 तर लेखी परीक्षेत 63 गुण मिळाले. त्यांना एकूण 102 गुण मिळाले. ओबीसी प्रवर्गातून तृतीयपंथींना आरक्षण देण्यात आले होते. महिलांसाठी 112 गुणांचा कट ऑफ होता, तर सर्वसामान्यांसाठी 126 गुणांचा कट ऑफ होता. कट ऑफसाठी आवश्यक गुण न मिळाल्याने त्यांची निवड झाली नाही. पोलीस भरती होण्यासाठी या दोघांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने या दोघांच्या बाजूने निकाल दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;