सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज, वाचा नेमके काय घडले?

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज, वाचा नेमके काय घडले?

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही महत्वाच्या भूमिकेत दिसली. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला. सोशल मीडियावरही सलमान खान हा चांगलाच सक्रिय दिसतो.

सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो सलमान खान याच्या घराच्या बाहेरील आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये पोलिस हे लोकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. सलमान खान याच्या घराबाहेर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे या व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसत आहे.

सलमान खान याला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक हे त्याच्या घराबाहेर पोहचले होते. मात्र, गर्दी तूफान वाढल्याने पोलिसांना लाठीचार्ज हा करावा लागला. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. काही लोक यादरम्यान जमिनीवर पडल्याचे देखील दिसत आहेत. लाठीचार्जनंतर गर्दी पसरल्याचे बघायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ही गर्दी लोकांनी केली होती. दरवर्षी सलमान खान हा आपल्या चाहत्यांना ईदच्या दिवशी आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटतो. सलमान खान याची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केल्याचे दिसत आहे. मात्र, सतत गर्दी वाढतच होती.

आता सलमान खान याच्या घराबाहेरील हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. सलमान खान याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर बिग बाॅसला होस्ट करताना देखील सलमान खान हा दिसतो. सलमान खान हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;