…तर पंतप्रधानांसह सगळे भाजप नेते जेलमध्ये जातील, मोदींच्या टीकेला मीसा भारती यांचं प्रत्युत्तर

…तर पंतप्रधानांसह सगळे भाजप नेते जेलमध्ये जातील, मोदींच्या टीकेला मीसा भारती यांचं प्रत्युत्तर

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी प्रचाराचं सत्र जोरदारपणे सुरू झालं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला राजद नेत्या मीसा भारती यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप केला होता. त्याला मीसा भारती यांनी उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांना निवडणूक रोख्यांवरून प्रश्नही विचारला आहेत.

पंतप्रधानांना प्रत्युत्तर देताना मीसा भारती म्हणाल्या की, इंडिया आघाडीने 30 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यातही पंतप्रधानांना तुष्टीकरण दिसत आहे. आम्ही शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न आणि किमान विक्री दर लागू करण्याबद्दल बोलतोय. त्यातही त्यांना अनुनय दिसतोय. पण, निवडणूक रोख्यांवर कोण उत्तर देणार आहे? आम्ही जर जनतेला संधी दिली तर पंतप्रधानांसह भाजपचे सगळे नेते कारागृहात जातील, अशा शब्दांत मीसा भारती यांनी पंतप्रधानांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;