ईदनिमित्त सलमान खानच्या ‘मुन्नी’चा खास लूक; नेटकरी पडले प्रेमात
सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील मुन्नी तुम्हाला आठवतेय का? मुन्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी हर्षाली मल्होत्री आता 16 वर्षांची झाली आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर दोन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
ईदनिमित्त हर्षालीने इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चांद नजर आया? असं कॅप्शन देत हर्षालीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये 'यूँ शबनमी' हे गाणं ऐकायला मिळतंय.
हर्षालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'चंद्र रीलमध्येच दिसला', असं एकाने म्हटलंय. तर चंद्राहूनही सुंदर तू आहेस, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. हर्षालीच्या या रीलला दोन लाखांहून अधिक लाइक्स आणि तीन दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List