दिल्ली मद्य धोरण प्रकरणी के. कविता यांना सीबीआयकडून अटक
कथित दिल्ली मद्य धोरण मनी लाँड्रींग प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली राऊज एव्हेन्यू न्यायालयाने अंतरिम अर्ज फेटाळून कविता यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिल पर्यंत वाढ केली होती. त्यांना 15 मार्च 2024 ईडीने अटक केली होती. आता याच प्रकरणात त्यांना सीबीआयनेही अटक केली आहे.
राऊज एव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी कविता यांच्या अंतरिम अर्जावर सुनावणी केली होती. त्यावेळी त्यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. कविता यांनी साक्षीदारांवर दबाव आणल्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनाला आलं असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यामुळे जर त्यांना जामीन दिला गेला तर हा धोका पुढेही संभवतो, असं न्यायालयाने म्हटलं होतं. ईडीने केलेल्या आरोपांनुसार, कविता या दिल्ली मद्यधोरण घोटाळ्यात सहभागी असलेल्या साऊथ ग्रुपच्या सदस्या आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List