वर्ध्यातील भाजप उमेदवार रामदास तडस अडचणीत; गंभीर आरोप करत सून लढणार लोकसभा निवडणूक

वर्ध्यातील भाजप उमेदवार रामदास तडस अडचणीत; गंभीर आरोप करत सून लढणार लोकसभा निवडणूक

ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रामदास तडस आणि तडस कुटुंबियांवर त्यांची सून पूजा पंकज तडस यांनी गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली आणि आपल्यावर तडस कुटुंबियांकडून कशाप्रकारे अत्याचार करण्यात आला याची माहिती पूजा यांनी दिली. यावेळी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेही उपस्थित होत्या. पूजा तडस यांनी वर्ध्यातून अपक्ष निवडणूक लढवत असल्याचेही जाहीर केले.

स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपांतून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न लावून दिले. त्यानंतर मला एका फ्लॅटवर नेऊन टाकले आणि फक्त उपभोगाची वस्तू म्हणून वापर केला. त्यातूनच बाळाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मानंतर तडस कुटुंबाने मला अपमानास्पद वागणूक दिली आणि हे बाळ कोणाचे आहे? असा सवाल करत डीएनए टेस्ट कर म्हणून माझ्या मागे लागले. मी डीएनए टेस्टसाठी तयार आहे, फक्त माझी अवहेलना करू नका, असे रामदास तडस यांची सून पूजा तडस 17 महिन्यांच्या बाळाला कडेवर घेत भरल्या डोळ्याने म्हणाल्या.

पूजा तडस पुढे म्हणाल्या की, मी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली. याचे पुरावेही आहेत. ज्या फ्लॅटवर मी राहिले तो विकून आम्हाला बेघर करण्यात आले. बाळाला घेऊन मी दारोदार फिरत असून इतक्या खालच्या पातळीवर राजकारण केले जात आहे. भाजप खासदार रामदास तडस मुलाला बेदखल केल्याचे म्हणतात. मग तुम्ही त्याला घरात का ठेवले? मला एकटीलाच घराबाहेर का काढले? माझ्यासोबत राजकारण का करताय? असा सवालही पूजा तडस यांनी केला.

महिलांना 33 टक्के आरक्षण दिले. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करता. मग मला न्याय का मिळत नाही? पंतप्रधान मोदी संपूर्ण देश माझा परिवार असल्याचे म्हणतात. त्याच कुटुंबातील रामदास तडस यांच्या सभेसाठी मोदी वर्ध्यात येणार आहेत. मी देखील तुमच्याच परिवारातील लेक असून मला न्याय हवा आहे. हा माझ्या बाळाच्या अस्तित्वाचा आणि माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, असेही पूजा तडस म्हणाल्या.

मला डीएनए टेस्ट करा म्हणतात. त्यामुळे लोकं माझ्याकडे वाईट नजरेने पाहतात. बाळाचा बाप कोण विचारतात? मी डीएनए टेस्टसाठी तयार आहे. फक्त माझी अवहेलना करू नका. मला दोन वेळचे अन्नही देत नाहीत. बाळाला कणकेत पाणी घालून दूध म्हणून पाजावे लागतेय. माझा दोष काय? जर लोकप्रतिनिधी सूनेला न्याय देऊ शकत नसेल, तर समाजाला काय देणार? असा सवाल करत पूजा तडस यांनी मोदींनी मला भेटीसाठी थोडा वेळ द्यावा आणि माझी समस्या जाणून घ्यावी, अशी मागणीही केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;