हरियाणात स्कूल बसचा भीषण अपघात, 6 मुलांचा मृत्यू; सरकारी सुट्टीच्या दिवशीही सुरू होती शाळा
हरियाणातील महेंद्रगड येथे गुरुवारी सकाळी स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 मुलांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय.
महेंद्रगड जिल्ह्यातील उन्हानी गावामध्ये हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांना घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून झाडाला धडकल्यानंतर उलटलेली बस क्रेनच्या मदतीने सरळ करण्यात आली.
#WATCH | Haryana: A student, who suffered injuries after a private school bus met with an accident in Mahendragarh’s Kanina says, “…The driver was drunk and he kept the speed at 120 which led to misbalance…” pic.twitter.com/zdheKME2CE
— ANI (@ANI) April 11, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 40 लहान मुलं होती. ईदची सरकारी सुट्टी असतानाही महेंद्रगड येथील जीएल पल्किक स्कूल सुरू होते. त्यामुळे मुलं बसमधून शाळेकडे निघाले होते. मात्र ही बस उन्हानी गावाजवळ पोहोचल्यावर ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाडाला धडकली. झाडाला धडक्यानंतर बस पटली झाली. अपघात झाला तेव्हा बसचा चालक नशेमध्ये धुंद होता असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. 5 मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर इतर मुलं जखमी झाले होते. जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List