आयुष्यात अडचणी आल्या की..; स्वामींबद्दल व्यक्त झाला स्वप्निल जोशी

आयुष्यात अडचणी आल्या की..; स्वामींबद्दल व्यक्त झाला स्वप्निल जोशी

बुधवारी स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला. अभिनेता स्वप्निल जोशी हा स्वामींचा मोठा भक्त आहे, हे अनेकांना ठाऊक आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वप्निलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ पोस्ट केला. स्वप्निल हा स्वामींचा निस्सीम भक्त आहे हे या व्हिडीओतून दिसून येत आहे. स्वामींच्या भक्तीसाठी स्वप्निलच्या घरात काही पाहुणे जमले आहेत. या सर्वांसोबत मिळून तो स्वामींची पूजा-अर्चना करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर स्वप्निल त्याच्या या स्वामींच्या भक्तीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. “मी कितीही कामात असलो किंवा अडचणीत असलो तरी स्वामी कायम सोबत आहेत, ही भावना मनात असते”, असं तो म्हणाला.

सध्या स्वप्निल त्याची निर्मिती असलेल्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याचसोबत तो ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटासाठीही शूटिंग करत आहेत. चित्रपटांचं काम आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा तो प्रयत्न करतोय. स्वामींबद्दल असलेल्या श्रद्धेविषयी बोलताना स्वप्निल म्हणाला, “स्वामींचं माझ्या आयुष्यात खूप जवळचं स्थान आहे. स्वामी म्हणतात ना, भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. असंच कायम ते आपल्या सर्वांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असतात. स्वामींचं स्मरण हे खूप सकारात्मक ऊर्जा देऊन जातं. म्हणून कितीही कामात असलो किंवा कितीही अडचणी आल्या तरी ते कायम सोबत आहेत, ही भावना मनात असते. कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वामींचं बोलावणं आलं की अक्कलकोटची वाट दिसते. यातून काम करण्याची आणखी प्रेरणा मिळते.”

पहा व्हिडीओ-

यंदाच्या वर्षी स्वप्निलने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आगामा काळात तो विविध प्रोजेक्ट्सद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या त्याच्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. 2004 मध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तब्बल 20 वर्षांनंतर त्याचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;