‘बोट’च्या ग्राहकांचा डेटा लीक
एअरपह्न आणि स्मार्ट वॉच बनवणाऱया बोट या गॅजेट पंपनीच्या ग्राहकांसाठी धोक्याची घंटा आहे. याचे कारण म्हणजे बोट पंपनीच्या सुमारे 75 लाख ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे.
हॅकरने ग्राहकांचा डेटा चोरून तो डार्क वेबवर अपलोड केलाय. या डेटामध्ये ग्राहकाचे नाव, पत्ता, पह्न नंबर, ई-मेल आयडी, ग्राहक आयडी अशाप्रकारची माहिती आहे. शॉपी फाय नावाच्या हॅकरने डेटा लीक केल्याची जबाबदारी स्वीकारलीय. दरम्यान, याबाबत बोट पंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List