गुंतवणुकीच्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला
शेअर मार्पेटमध्ये पैसे गुंतवण्याच्या नावाखाली ठगाने महिलेची 9 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. महिलेला गेल्या वर्षी टेलिग्राम चॅनलवर एक लिंक आली. त्यांना स्टॉक मार्पेटबाबत चर्चा सत्राबाबत आयडी आणि पासवर्ड देण्यात आला. ग्रुपमध्ये असलेल्या एका महिलेने त्याना इन्स्टिटय़ुशन अकाउंटबाबत विचारणा केली. तसेच त्याना पैसे गुंतवणूक करण्यासाठी विविध बँक खात्यांचे नंबर दिले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने पैसे गुंतवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List