पक्ष फोडून सत्तेत येणाऱया भाजपविषयी जनतेत द्वेष

पक्ष फोडून सत्तेत येणाऱया भाजपविषयी जनतेत द्वेष

दुसऱयांचे पक्ष फोडून सत्तेत येणाऱया भाजपविषयी जनतेमध्ये प्रचंड द्वेष पसरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण आता बदलू लागले आहे. त्यामुळे जनता नक्कीच देशात सत्तापालट करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

fिशराळा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, गतवेळची गावागावातील बूथनिहाय मतांची माहिती घ्या. वाढ करू शकतो, याचा अभ्यास करा. विरोधी पक्षातील उमेदवारांबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही. देशात महिला असुरक्षित आहेत. तर, सत्यजित पाटील जनतेचे खासदार म्हणून आपणाला न्याय देतील. त्यांच्या विजयाची जबाबदारी आपल्यावर आहे. आता देशातील वातावरण बदलायला लागले आहे. देशात भाजपची पूर्वीसारखी प्रतिमा दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडी सर्वांना आधार देण्याचे काम करेल. पक्ष फुटले असले तरी लोक फुटलेले नाहीत, हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ असल्याचेही त्यांनी सांगितले.

नितीन बानुगडे पाटील म्हणाले, ही निवडणूक गद्दारांविरोधात निष्ठावंत यांच्यात आहे. आपणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हवे, भाजपचे नको. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी आपणाला ही निवडणूक जिंकावीच लागेल. देशाला महासत्ता बनवण्यासाठी भाजपला पराभूत करावे लागेल.

सत्यजित पाटील म्हणाले, मी शाहूवाडीचा नाही तर शिराळाचाच उमेदवार आहे. गेल्या 25 वर्षांत अपेक्षित विकास दिसत नाही. सध्याच्या सरकारच्या विकासापेक्षा जाहिराती जास्त दिसत असल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. मेळाव्याला यावेळी प्रतीक पाटील, अभिजीत पाटील, नेताजी पाटील, सम्राट नाईक, विजयराव नलवडे, बाळासाहेब नायकवडी, विराज नाईक, रणधीर नाईक, ऍड. भगतसिंग नाईक, भीमराव गराडे, तानाजी पाटील, पी. आर. पाटील, देवराज पाटील, सुनीता देशमाने, कुंदा पाटील, रणजित पाटील, विश्वास कदम, अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. साधना पाटील यांनी आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;