Ratnagiri crime news – दारुविक्री विरोधात पोलिसांची धडक मोहिम, 9 लाखांची दारु जप्त
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अवैध दारुविक्रीवर कारवाई करत 111 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 9 लाख 42 हजार 678 रुपयांची 1 हजार 47 लीटर हातभट्टीची दारु, 73.48 लीटर विदेशी बनावटीची दारु, 42.48 लीटर देशी दारु जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अंमली पदार्थ जप्तीच्या दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 4.294 किग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 429 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 969 व्यक्तींची शस्त्रे जमा करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 हजार 551 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 212 शस्त्र परवानाधारक मयत किंवा वयोवृध्द असल्याने ती रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List