पैसे डबल करण्याच्या नावाखाली केली फसवणूक

पैसे डबल करण्याच्या नावाखाली केली फसवणूक

पैसे डबल करून देतो, असे सांगून महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पवन रामगुडे याला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली..

तक्रारदार महिलेची एक करीअर सल्लागार आणि मुख्याध्यापक महिलेसोबत ओळख झाली होती. करीअर सल्लागार असलेल्या त्या महिलेने तिच्या परिचित असलेल्या एकाची माहिती दिली. गुंतवणूक केल्यास रक्कम मिळते असे तिला सांगितले. जानेवारीत त्याने महिलेला पह्न केला. 70 हजार रुपये गुंतवल्यास दोन महिन्यांनी 3 लाख 64 हजार तर पाच हजार रुपये गुंतवल्यास तीस दिवसांनी 6050 रुपये मिळणार अशी स्कीम सांगितली.त्यानंतर ठगाने महिलेला एक लिंक पाठवली. तसेच पंपनीमध्ये खाते उघडण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन सुरुवातीला 75 हजार रुपये पाठवले. अशाप्रकारे पैसे डबल मिळतील म्हणून तिने आणखी काही पैसे गुंतवले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;