Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीकडून साताऱ्यात शशिकांत शिंदे

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीकडून साताऱ्यात शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार आज जाहीर केले. साताऱयात राष्ट्रवादीने आमदार शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे तर रावेरमध्ये श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला 10 जागा आल्या आहेत. त्यापैकी 9 उमेदवार राष्ट्रवादीने जाहीर केले आहेत. आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून तिथे कुणाला उतरवले जाणार याबद्दल उत्सुकता होती. शशिकांत शिंदे यांच्यासह तिघांच्या नावांचा विचार सुरू होता. अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपच्या रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे. रक्षा खडसे या राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेशकर्ते झालेले एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;