ईडीच्या अटकेविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात

ईडीच्या अटकेविरोधात  केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात

केजरीवाल यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पुढचे चार दिवस न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे सोमवारआधी याचिकेवर सुनावणी होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करून घेण्याबद्दल आम्ही विचार करू, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज सांगितले.

दिल्ली सरकारचे मंत्री तसेच आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सर्वोच्च न्यायालय आम्हाला दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली. कथित मद्य धोरण घोटाळय़ाचा कांगावा करून आम आदमी पार्टीला संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

 

आपच्या मंत्र्याचा राजीनामा

आम आदमी पक्षाचे दिल्लीच्या पटेल नगरचे आमदार राजकुमार आनंद यांनी नुकताच मंत्रिपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजकुमार आनंद यांनी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पक्षाने भ्रष्टाचार करण्यासाठी काही धोरणे बनवली आहेत. मी या धोरणांशी सहमत नाही. म्हणूनच मी आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे आनंद यांनी म्हटले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;