हमास प्रमुखाची तीन मुले इस्रायली हल्ल्यात ठार
हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हनीये याचे तीन मुलगे इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. हनीये याचे नातेवाईक आणि हमासच्या अधिकृत टीव्ही चॅनेलने याला दुजोरा दिला. हाजेम, अमीर आणि मोहमद हे तिघेजण काही कुटुंबीयांसोबत इस्रायलने शाती निर्वासित छावणीजवळ केलेल्या हल्ल्यात मारले गेले, असे हमासच्या अल अक्सा चॅनेलवरून सांगण्यात आले. सध्या कतारमध्ये विजनवासात असलेला इस्माईल हनीये हा मूळचा शाती येथील रहिवासी आहे. इस्रायलकडून अद्याप यासंदर्भात काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List