माकडांना जांभळे देऊन आंबे वाचवले, गोव्यातील शेतकऱ्याच्या देसी ‘जुगाड’ची चर्चा

माकडांना जांभळे देऊन आंबे वाचवले, गोव्यातील शेतकऱ्याच्या देसी ‘जुगाड’ची चर्चा

गोव्यातील एका शेतकऱयाने माकडांपासून आंब्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक देसी जुगाड केला. महागडे आंबे माकडांपासून सुरक्षित रहावे यासाठी या शेतकऱयाने जांभळाच्या झाडावर वानरांसाठी जांभळे सोडून दिली आहेत. यामुळे माकडे महागडय़ा आंब्याकडे फिरकत नाहीत, असे या शेतकऱयाने सांगितले. या शेतकऱयाचे नाव नेस्टर रंगले असे आहे. शेतकऱयाचा देसी जुगाड चांगलाच उपयोगी पडला असून महागडय़ा आंब्याचे संरक्षण झाले आहे. जांभूळ हे देशातील अनेक भागांत आढळणारे लोकप्रिय फळ आहे. विशेष करून हे गोव्यात उष्णकटिबंधीय जलवायू भागात जास्त आढळते. जांभूळ हे एक न्यूट्रास्यूटिकल्स फळ आहे. जे पौष्टिक सोबत औषधींसाठी खूपच उपयोगी पडते, असे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च (आयआयएचआर) बेंगळुरूमधील फळ विज्ञानातील तज्ञ वैज्ञानिक डॉ. एस. प्रिया देवी यांनी सांगितले.

जांभळाचे अनेक फायदे
अनेक दशकांपासून उन्हाळय़ात जांभळाचे पीक भरपूर येते. यात विटामिन सी आणि ग्लुकोज व फ्रुक्टोज कमी झाल्याने डायबेटिज रुग्णांना हे फार उपयोगी पडते. तरीही याचा व्यावसायिकतेसाठी कमी वापर केला जात आहे. शेतकऱयाला तज्ञांकडून समजले की जांभळाचे देखील कीटक आणि माकडांसाठी नैसर्गिक प्रतिबंधक म्हणून काम करू शकतात. यामुळे शेतकऱयाने या जुगाडाचा वापर केला आणि माकडांना आंब्यापासून दूर केले.

आंब्यासाठी कायपण!

शेतकऱयाने जांभळे माकडासाठी राखून ठेवली. शेतकऱयाला तज्ञांकडून समजले की जांभळाचे मोठे फायदे आहेत. यामुळे शेतकऱयाने या जुगाडाचा वापर केला आणि माकडांना आंब्यापासून दूर केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;