ऑनलाइन मतदार नावनोंदणीमध्ये नगर जिल्ह्यात महिलांची आघाडी

लोकसभा निवडणुकीसाठी महिला मतदारांमध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे. 23 जानेवारी 2024 ते 1 एप्रिल या काळात पुरुषांपेक्षा महिला मतदारांनी अधिक ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये महिला मतदार 16 हजार 959, तर 16 हजार 276 पुरुष मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांची आघाडी आहे.

नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांत एकूण 36 लाख 47 हजार 889 मतदार आहेत. 13 मे रोजी होणाऱया मतदानासाठी एकूण 3 हजार 734 मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. निवडणूक आयोगाने ऑनलाइन आणि ऑफलाइन नावनोंदणी करण्यासाठी प्रशासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मतदारांना घरबसल्या नावनोंदणी करता येणार आहे.

ऑनलाइन सुविधा असल्याने 23 जानेवारी 2024 ते 1 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 33 हजार 235 मतदारांनी नावनोंदणी केली आहे. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या मतदार नोंदणीत 90 टक्के नवमतदार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी त्यांच्या मनात उत्सुकता आहे.

वयोगटानुसार आकडेवारी

वय 18 ते 19 ः पुरुष ः 4 हजार 655, महिला ः 2 हजार 690

वय 20 ते 29 ः पुरुष ः 8 हजार 476, महिलाः 9 हजार 302

वय 30 ते 79 ः पुरुष ः 3 हजार 119, महिला ः 5 हजार 22

वय 80 वयापुढील ः पुरुष 27, महिला ः 29

एकूण पुरुष ः 16 हजार 276, महिला ः 16 हजार 959

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;