अल्पवयीन गरोदर पीडितेला मिळणार वैद्यकीय उपचार

अल्पवयीन गरोदर पीडितेला मिळणार वैद्यकीय उपचार

अल्पवयीन गरोदर पीडितेने वैद्यकीय उपचारासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. पीडितेला जे. जे. रुग्णालयात उपचार दिले जातील, अशी हमी राज्य शासनाने न्यायालयात दिली. गुह्याची नोंद नसल्याने पीडितेला उपचार देण्यास रुग्णालयांनी नकार दिला होता. न्यायालयाने याचा जाब विचारताच पीडितेला उपचार देण्यास राज्य शासनाने तयारी दर्शवली.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पीडिता गरोदर आहे. तिला उपचार नाकारले जात आहेत. यावर तुमचे काय म्हणणे आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. उपचार नाकारण्याचा प्रश्न उद्भभवत नाही. पीडितेने केवळ पोलिसांकडे जबाब द्यावा. हा जबाब गोपनीय ठेवला जाईल, असे सरकारी वकील पौर्णिमा पंथारीया यांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे पीडितेला दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाचे निरीक्षण

जे. जे. रुग्णालयात पीडितेने उपचारासाठी जावे. तिची ओळख गुप्त राहिल याची काळजी तेथील अधिष्ठाताता यांनी घ्यावी. आश्रमात भरती करताना तिच्या सोबत एक डॉक्टर द्यावा, असे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले. प्रसुती झाल्यानंतर बाळ दत्तक देणार असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. यासाठी योग्य ती कार्यवाही केली जावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण

2 पीडितेचे वय 17 वर्षे 4 चार महिने आहे. ती गरोदर आहे. वैद्यकीय उपचारासाठी ती खासगी व शासकीय रुग्णालयात गेली. पीडिता अल्पवयीन असल्याने रुग्णालयांनी तिच्याकडे गुन्हा नोंदवल्याची प्रत मागितली. संमतीनेच शारीरीक संबंध झाले आहेत. कोणाविरोधातही गुन्हा नोंदवायचा नाही, असे पीडितेचे म्हणणे आहे. गुन्हा नोंदवल्याची प्रत न मागताच रुग्णालयाने उपचार करावेत, असे पीडितेचे म्हणणे आहे. त्यासाठी तिने ही याचिका केली होती. तिची काळजी घेण्यास एक आश्रम तयार आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;