Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन उमेदवार जाहीर, साताऱ्यातून यांना दिली उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बुधवारी दोन उमेदवार जाहीर केले. सातार्यातून शशिकांत शिंदे तर रावेर येथून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

सातार्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे या जागेवर उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव आज जाहीर करण्यात आले. रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले असून, त्यांचा सामना भाजपच्या रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List