IPL 2024 – गुजरातच्या शिलेदारांनी बाजी मारली, राजस्थानच्या विजयी रथाला लावला ब्रेक
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर गुजरातने बाजी मारली. राशीद खान आणि तेवातिया या गुजरातच्या शिलेदारांनी अवघड वाटणारा विजय गुजरातसाठी खेचून आणला. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने 2 षटकार आणि 6 चौकरांच्या मदतीने 72 धावांची मोठी खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. साई सुदर्शन (29 चेंडू 35 धावा) व्यतिरिक्त इतर कोणत्याच फलंदाजाने समाधानकारक धावा केल्या नाहीत. युजवेंद्र चहलच्या जाळ्यात गिल आणि त्यानंतर विजय शंकर (10 चेंडू 16 धावा) फसले त्यामुळे गुजरात आता हा सामना गमावणार असे चित्र निर्माण झाले होते. पण शेवटच्या दोन षटकांमध्ये राशीद खान (11 चेंडू 24 धावा) आणि तेवातिया (11 चेंडू 22 धावा) यांनी महत्वाची खेळी केली त्यामुळे गुजरातने राजस्थानचा तीन विकेटने पराभव केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List