Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजे भोसले वेटिंगवरच

Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजे भोसले वेटिंगवरच

भारतीय जनता पक्षाने बुधवारी त्यांची दहावी यादी जाहीर केली. मात्र या यादित देखील सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले उदयनराजे भोसले यांचे नाव नाहीए. त्यामुळे दहा याद्यांनंतरही उदयनराजे भोसले हे वेटिंगवरच असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

उदयराजे हे गेल्या महिनाभरापासून वेटिंगवर आहेत. उमेदवारी साठी उदयराजे हे दिल्लीला देखील तळ ठोकून होते. अमित शहा यांनी त्यांना भेट देण्यासाठी तब्बल चार दिवस थांबवून ठेवले होते. दरम्यान चार दिवसानंतर भेट दिल्यानंतर अमित शहा यांनी उमेदवारीचे आश्वासन उदयनराजे भोसले यांना दिले होते. मात्र आता दहावी यादी आली तरी उदयनराजे यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. दरम्यान उमेदवारीच्या प्रश्नावर बोलताना उदयनराजे यांनी महाविकास आघाडीने शाहू महाराज यांना घरी जाऊन उमेदवारी दिली, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगत भाजपला सुनावले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बुधवारी दोन उमेदवार जाहीर केले. त्यात सातार्‍यातून त्यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सातार्‍याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे या जागेवर उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव आज जाहीर करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;