उदगीर-निलंगा राज्यमार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक, चार जणांचा मृत्यू

उदगीर-निलंगा राज्यमार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक, चार जणांचा मृत्यू

भरधाव ट्रकने कार चिरडल्याने चार जणांचा जागीच चेंदामेंदा झाला. हा भीषण अपघात उदगीर-निलंगा राज्यमार्गावर धनेगावजवळ बुधवारी घडला. अपघातातील सर्व मृत मध्य प्रदेशातील इंदोर येथील व्यापारी असल्याचे सांगण्यात आले.

वलांडीहून निलंग्याकडे जात असलेल्या एर्टिगा कारला धनेगावजवळ समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात गाडीचा चालक सचिन जैन (40), संजय जैन (45, माही क्रिएशन), संतोष जैन (सेल्समन), संजय जैन (42, माझा शर्ट्स) हे चौघेही जागीच ठार झाले. कारचा चेंदामेंदा झाल्याने जेसीबीच्या मदतीने पत्रा कापून चौघांचे मृतदेह बाहेर काढावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्व मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;