स्वतःच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जाणाऱ्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू
स्वत:च्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जाणार्या तरुणाला हळद लागण्यापूर्वीच मृत्यूने गाठले. लोहारा रस्त्यावर बुधवारी दुचाकीला कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला.
उदगीर तालुक्यातील अनुपवाडी येथील विशाल भिवा निलेवाड (22) याचे 18 एप्रिलला लग्न ठरले होते. लग्न पत्रिका देण्यासाठी बुधवारी विशाल आपला चुलतभाऊ आकाशा धोंडीबा निलेवाड (23) याच्यासह करडखेलला निघाला होता. दुपारी 12.45 वाजता लोहारा रस्त्यावर दूध डेअरीजवळ धनमाळ येथे विशालच्या पल्सरला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात विशाल आणि आकाश या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List