जिरवाजिरवीच्या राजकारणात विखे पटाईत! नीलेश लंके यांचा खा. डॉ. विखे यांच्यावर हल्लाबोल

जिरवाजिरवीच्या राजकारणात विखे पटाईत! नीलेश लंके यांचा खा. डॉ. विखे यांच्यावर हल्लाबोल

खासदार म्हणून विकास कामे करण्याऐवजी खा. डॉ. सुजय विखे हे जिरवाजिरवीच्या राजकारणात पटाईत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला.

नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेस जामखेड तालुक्यातील खर्डा येथून प्रारंभ होऊन जामखेड शहरात समारोप झाला. विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना लंके यांनी खा. डॉ. सुजय विखे यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर हल्लाबोल केला. आमदार रोहित पवार हे यावेळी उपस्थित होते.

लंके म्हणाले, विकास कामे सोडून खा. विखे हे डाळ, साखर वाटत होते. खासदारकीच्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडून विकासाच्या मुद्यावर निवडणूकीला समोरे जाणे त्यांच्याकडून अपेक्षीत आहे. त्यांनी जिल्हयात किती उद्योग आणले? किती तरूणांच्या हाताला काम दिले? हे सांगून मते मागावीत. इंग्लिश भाषा येते का म्हणून मला हिणवण्यात काय हशील आहे, असा सवाल लंके यांनी केला.

लंके म्हणाले, मी खासदार होणारच आहे. खासदार झाल्यानंतर विजयाची पहिली सभा जामखेड येथे घेणार असल्याचे सांगत जामखेडला रेल्वे आणू अशी ग्वाही त्यांनी दिली. मला लोक नोट देतात आणि व्होटही देतात असे सांगत जनसंवाद यात्रेदरम्यान शेकडो नागरीकांना आपल्या निवडणूकीसाठी मदत केल्याचे लंके म्हणाले. तुम्हाला काम करणारा खासदार हवा की इंग्रजी बोलणारा हवा असे सांगत त्यांनी खा. विखे यांना टोला लगावला.

यावेळी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, इंग्रजी येत नाही हा प्रचाराचा विषयच होऊ शकत नाही. विकासाचे मुद्दे महत्वाचे आहेत. कांदा प्रश्‍न लोकसभेत मांडला पाहिजे होता. मात्र कांदा प्रश्‍नावर आवाज न उठविता शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडून देण्यात आले. महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. कांदा, दुधाचे भाव पडले असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;