महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार, भाजपचे 45 जागांचे स्वप्न धुळीला मिळणार; सर्वेक्षण अहवाल व्हायरल

महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार, भाजपचे 45 जागांचे स्वप्न धुळीला मिळणार; सर्वेक्षण अहवाल व्हायरल

Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून भाजपचं 45 जागा मिळवण्याचं स्वप्न धुळीला मिळणार आहे, असा अहवाल जाहीर झाला आहे. लोक पोलने केलेल्या सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल सध्या व्हायरल होत आहे.

लोक पोल या एक्स पोस्टवरील अकाउंटवरून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. या संस्थेने प्रत्येक लोकसभा क्षेत्रात सरासरी 1350 मतदारांशी चर्चा केली. त्यानंतर मतदारांनी व्यक्त केलेल्या मतांच्या आधारे हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यात महायुतीला निम्म्या म्हणजे 21 ते 24 जागाच मिळणार आहेत. त्यातही भाजपकडे सगळ्यात जास्त म्हणजे 14 ते 17 जागा असतील.महाविकास आघाडीला 23 ते 26 जागा मिळणार आहेत, असंही या अहवालात म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;