नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात 8 हजार पानांचे आरोपपत्र दाखल
नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांनी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे 8 हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
भाजपाचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली या बँकेचे कामकाज सुरू होते त्यांच्या अधिपत्याखाली संचालक मंडळ गैरकारभार केला होता बराबर कर्ज प्रकरण सुद्धा या बँकेमध्ये करण्यात आलेले होते त्यामुळे या बँकेची चौकशी व्हावी अशी मागणी त्यावेळेला बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्यासह पोपट लोढा अच्युत पितळे,राजेद्र चोपडा, आदिलसह केली होती. शंभर वर्षाची परंपरा असलेल्या या बँकेला त्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरघर लागण्याचे बोलले जात होते या बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने हाकल्यामुळेच बँकेवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डबघाईला जाण्याची वेळ यांच्याच कार्य काळामध्ये आली आहे विशेष म्हणजे आता ही बँक बंद ही झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी या बँकेमध्ये अडकलेले आहेत.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमर्फत सुरू आहे. पोलीस प्रशासनाने या संपूर्ण घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे. यात प्रथमदर्शनी सुमारे 105 जणांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. तर सुमारे 291 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आरोपींपैकी 10 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यात संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, सीए शंकर घनश्यामदास अंदानी, बँकेचा अधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनोज वसंतलाल फिरोदिया, कर्जदार प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर, अमित वल्लभभाई पंडित यांचा समावेश आहे.
बँकेतील कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेचा गैरवापर, तसेच कर्जाच्या रकमेतून जुन्या कर्जाची रकमा भरणे, काही रक्कम संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आलेले आहे. तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी असलेल्या खात्यांमधून कर्जदारांच्या खात्यांमध्ये रकमा वर्ग झाल्याचेही तपासात समोर आलेले आहे. फॉरेन्सिक अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आलेले असून या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींच्या अटकेनंतर 90 दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याच्या आत दोषारोप पत्र आर्थिक गुन्हे शाखेमार्फत न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
दरम्यान आर्थिक गुन्हे आणि विभागाने या बँकेचे तपासणी करून केलेले आहे त्यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहे बोगस कर्ज यासह बँकेचे विविध प्रकारचे नागरिकांना फसवल्याचे मुद्दे हे यामधून पुढे आलेले आहेत तर सगळ्यात जास्त मध्ये शेवगाव तालुक्यामध्ये सुमारे 300 हून अधिक पिशव्यांमध्ये बोगस होणं निघालेलं आहे. त्याची सुद्धा स्वतंत्र अशी करिअर दाखल करण्यात आलेले आहेत व त्याचा सुद्धा चौकशी करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे एकंदरीतच येथील सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कारभार केल्यामुळे बँकेला टाळे लागलेले आहेत व दुसरीकडे सर्व सामान्य लोकांचे पैसे आज अडकल्यामुळे मोठी पंचायत निर्माण झालेली आहे.
अर्बन बँक वाचावी म्हणून राजेंद्र गांधी यांच्या अधिपत्याखाली एक बचाव समिती स्थापन करण्यात आलेली होती त्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू होता. त्यामुळे बँकेचे व्यवहार कशा पद्धतीने झाले हे यातून सिद्ध झालेले होते व याचा फायदा प्रशासनाला सुद्धा तपासामध्ये झालेला होता. विशेष म्हणजे गांधी यांनी नुसते स्थानिक पातळीवर नाही तर दिल्लीच्या कार्यालयाला सुद्धा यांच्या तक्रारी देऊन विविध भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी लक्ष भरलेले होते. सबका असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने कारभार केला हे अनेक वेळेला बोलले जात होते. पण आता बँक बुडाली मग सर्वसामान्यांचे काय जे ज्या ठिकाणी कर्मचारी कार्य होते, त्यांची सोय आता कशा पद्धतीने लावला असा हा खरा प्रश्न आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List