महाकाल मंदिरात भस्म आरतीच्यावेळी आगीत होरपळलेल्या सेवकाचा मुंबईत मृत्यू

महाकाल मंदिरात भस्म आरतीच्यावेळी आगीत होरपळलेल्या सेवकाचा मुंबईत मृत्यू

मध्य प्रदेशातील उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरती वेळी आगीत पुजाऱ्यासह 14 भाविक होरपळल्याची घटना घडली होती. आगीत भाजलेल्या सत्यनारायण सोनी नावाच्या 79 वर्षीय सेवकाचा मुंबईतील रुग्णालयात बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

25 मार्च रोजी लागलेल्या आगीत 14 जखमींपैकी एकाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. उज्जैन जिल्हा रूग्णालयाआधी त्यांना इंदूर येथील अरबिंदो रूग्णालयात भरती केले होते. तिथून त्यांच्यावर चांगल्या उपचारासाठी मुंबईत आणले होते. महाकाल मंदिरात 25 मार्च रोजी सकाळी 5.49 वाजता भस्म आरती सुरू होती. भाविक गुलाल उधळत होते. भस्म आरती करणारे पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. गुलालामधील रसायनामुळे आगीचा भडका उडाला असा अंदाज व्यक्त केला होता. आगीमुळे काही काळ भाविकांमध्ये घबराहट पसरली होती. पुजारी संजीव यांच्यासह 14 भाविक जखमी झाले होते. जखमींमध्ये 9 जणांना इंदूर येथील रूग्णालयात नेण्यास सांगितले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तपासाचे आदेश दिले होते. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले होते.

ही दुर्घटना 25 मार्च रोजी झाली. महाकाल मंदिरात हजारो भक्त उपस्थित होते. सर्व महाकाल मंदिरात होळी साजरी करत होते. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मुलगा वैभव यादव आणि मुलगी आकांशी या अपघातावेळी मंदिरात उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचे कुटुंब तसेच गर्भगृहाबाहेर उपस्थित असलेले सर्व भाविक सुरक्षित राहिले. त्याचबरोबर परिस्थितीही वेळीच नियंत्रणात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;