जान्हवीच्या गळ्यातील लॉकेटने केले कन्फर्म, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातूला करतेय डेट

जान्हवीच्या गळ्यातील लॉकेटने केले कन्फर्म, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातूला करतेय डेट

janhvi kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू उद्योगपती शिखर पहाडियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. जान्हवी कपूर अनेकदा शिखरसोबत धार्मिक स्थळांवर देखील दिसतेय. पण दोघांनीही उघडपणे अजून त्यांच्या नात्याची पुष्टी केली नव्हती. तसेच या बातम्यांवर देखील त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.  आता जान्हवी कपूर ही खरंच शिखर पहाडियाला डेट करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

जान्हवीच्या गळ्यात कोणाचे लॉकेट

काल जान्हवी कपूरने तिचे वडील बोनी कपूर यांनी प्रोड्युस केलेल्या ‘मैदान’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. यावेळी जान्हवी कपूर व्हाइट लूकमध्ये दिसली. पांढऱ्या पँटसह पांढरा ब्लेझर आणि मॅचिंग हील्स तिने घातली होती. अभिनेत्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. जान्हवीच्या लूकपेक्षा तिच्या गळ्यात असलेल्या चांदीच्या पेंडेंटने लोकांचे लक्ष वेधून घेतले. जान्हवीने गळ्यात घातलेला सानुकूलित नेकलेस तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचे टोपणनाव ‘शिकू’ असे लिहिलेले होते.

जान्हवी कपूरने आणि शिखर पहाडिया यांनी आपलं नातं अजून जाहीर केलं नसले तरी आता तिच्या गळ्यात शिखरच्या नावाच्या लॉकेटने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. जान्हवी कपूर आता प्रसिद्धीच्या झोतात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी कपूर ही आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ चित्रपटात ती दिसणार आहे. जान्हवी कपूर आणि ज्युनियर NTR यांचा ‘देवरा पार्ट 1’ 10 ऑक्टोबर 2024 रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘देवरा’ चित्रपटात जान्हवी आणि एनटीआरसोबत सैफ अली खानही मुख्य भूमिकेत आहे. जान्हवीचा हा पहिला तेलगू चित्रपट आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही उत्सूकतेची बाब आहे. याशिवाय जान्हवी कपूर राम चरणच्या ‘आरसी 16’ या चित्रपटातही दिसणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;