ट्रक कारच्या धडकेने भीषण अपघात, चार जण ठार

ट्रक कारच्या धडकेने भीषण अपघात, चार जण ठार

निलंगा ऊदगीर राज्य मार्गावर असलेल्या धनेगाव ता. देवणी जवळ बुधवारी दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. सदरील मृत व्यक्ती हे मध्यप्रदेशातील इंदूर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इरटिका कार ही वलांडी हुन निलंग्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक बसली.या अपघातात कार मधील चौघाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. संजय जैन (45) असे त्यातील एकाचे नाव असून तो मध्यप्रदेश इंदूर येथील असल्याचे समजते .

हा अपघात इतका भयंकर होता की ,कारचा चेंदामेंदा झाला असून जेसीबीच्या सहाय्याने कारचा पत्रा कट करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव डोके व सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.घटनास्थळावर बघ्याची खुप मोठी गर्दी झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;