गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीत घट; दरवाढीमुळे खरेदीकडे अनेकांनी फिरवली पाठ

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीत घट; दरवाढीमुळे खरेदीकडे अनेकांनी फिरवली पाठ

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, चांदी, अंलकार किंवा नव्या गोष्टींची खरेदी करण्यात येते. यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. तसेच गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या दराने उसळी घेतली असून सराफा बाजारातही तेजी आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल, असा अंदाज होता. मात्र, सोन्याच्या दराने 70 हजाराचा टप्पा गाठल्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीरडे पाठ फिरवली.

काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सोन्याचा भाव 60 हजार प्रति 10 ग्रॅम होता. तर आठवड्याभरापूर्वी सोने 63 हजारांवर पोहचले होते. आता बाजारात सोन्याच्या दराने 70 हजाराचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे ग्राहकांनी यंदा सोनेखरेदीकडे पाठ फिरवल्याचे सराफा बाजारातून सांगण्यात आले. सध्या लग्नसराईला सुरुवात झाल्याने सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सोन्याचे दर वाढल्याने महिलांचा कल आता जायमंड वर्कचे दागिने घेण्याकडे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच पूजेसाठी चांदीच्या नाण्यांनाही बाजारात मागणी आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी ग्राहकांनी पाठ फिरवली असली तरी बुधवारी सोने-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. बुधवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 7174 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 6576 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज तसेच चांदीच्या किमतीत 100 रुपयांनी वाढली असून चांदीचा दर 85,500 रुपये प्रतिकिलो आहे. तर मुंबईत सोन्याचा दर 71,740 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;