सुधीर मुनगंटीवारांच्या बेताल वक्तव्याविरोधात काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुधीर मुनगंटीवारांच्या बेताल वक्तव्याविरोधात काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

>> प्रसाद नायगावकर

भाजप नेते स्वतःला आणि पक्षाला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवतात. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगेळेच आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्तीची पूजा करतात. तर भाजप नेते नारी शक्तीचा आपल्याच भाषणातून अनादर करतात, असे दिसून येत आहे. चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत भाजपचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची काँगेस नेत्यांवर आरोप करताना जीभ घसरली. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा वणी महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात प्रचाराला जोरदार सुरवात झाली आहे.विविध पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात लढत होणार आहे. भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपूर येथे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेस नेत्यांवर आरोप केले. यावेळी बहीण-भावाच्या नात्यावर बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस महिला आघाडीकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

वणी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मुनगंटीवार यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संध्या बोबडे, वंदना आवारी, किरण देरकर, गीता उपरे,वंदना दगडी, आशा टोंगे, मंदा बांगरे, छाया निदेकर, आशा कोराटे, साधना गोहोकार, सविता रासेकर, सुरेखा वडीचार, नीता डाहाट, विजया आगबत्तवार, वैशाली देठे, सुरेखा ढेंगळे, सुनीता बोढे यांच्या सह शेकडो महिला उपस्थित होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;