लष्कराची पॉवर वाढली; रशियाचे 24 इग्ला-एस मॅनपॅड्स हिंदुस्थानात दाखल

लष्कराची पॉवर वाढली; रशियाचे 24 इग्ला-एस मॅनपॅड्स हिंदुस्थानात दाखल

हिंदुस्थानी लष्कराला रशियन बनावटीची इग्ला-एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम (मॅनपॅड्स)च्या पहिल्या बॅचमध्ये 24 इग्ला-एस मिळाली. ज्यात 100 क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इग्ला-एस सिस्टम आल्याने हिंदुस्थानी लष्कराची पॉवर वाढणार आहे. तसेच वायू संरक्षणाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. इग्ला-एस हाताने चालवले जाणारे डिफेन्स सिस्टम आहे. याला कोणतीही व्यक्ती ऑपरेट करू शकते. उड्डाण करणाऱया विमानाला पाडण्यासाठी याचा वापर होणार आहे. इग्ला एस सिस्टमला देशाच्या उत्तरेच्या सीमेकर आणि उंच डोंगराळ भागात तैनात केले जाईल. डोंगराळ भागात इग्ला एस मॅनपॅड्स खूपच फायदेशीर ठरतात. इग्ला-एसमध्ये 9एम 342 मिसाइल, 9पी 522 लॉन्चिंग मॅकेनिज्म, 9व्ही 866-2 मोबाइल टेस्ट स्टेशन आणि 9एफ 719-2 टेस्ट सेटचा समावेश आहे. गेल्याकर्षी रशियासोबत 120 लॉन्चर आणि 400 मिसाईलच्या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;