आता रडण्यासाठी अश्रू …, नियतीने दाखवलेल्या ‘त्या’ प्रसंगाबद्दल जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य

आता रडण्यासाठी अश्रू …, नियतीने दाखवलेल्या ‘त्या’ प्रसंगाबद्दल जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य

‘शोले’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सिलसिला’, ‘कल हो ना हो’, ‘पिया का घर’, ‘चुपके चुपके’, ‘जवानी दिवानी’ अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री जया बच्चन यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील जया बच्चन कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा जया बच्चन यांच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या… अशात ‘माझ्याकडे आता रडण्यासाठी देखील अश्रू नाहीत…’ असं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं होतं. आता जया बच्चन असं का म्हणाल्या असतील असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल… तर तेव्हा नक्की काय झालं होतं जाणून घेऊ…

किस्सा आहे ‘सिलसिला’ सिनेमा दरम्यानचा… ‘सिलसिला’ सिनेमा हीट ठरला होता. सिनेमाची कथा तर चाहत्यांना आवडलीच. पण सिनेमात असलेल्या कलाकारांमुळे देखील सिनेमा चर्चेत राहिला. तेव्हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

सिनेमात जया बच्चन आणि रेखा यांना एकत्र कास्ट करण्याची इच्छा अमिताभ बच्चन यांची होती असं देखील सांगितलं जातं… एवढंच नाहीतर, यश चोप्रा यांची देखील अशीच इच्छा होती. तेव्हा सर्वत्र रेखा – अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यामुळे सिनेमाचं शुटिंग गुपचूप काश्मीर येथे करण्यात आलं.

माध्यमांना दूर ठेवण्याचा प्रयत्न यश चोप्रा यांनी पूर्ण पणे केला होता. रिपोर्टनुसार, सिनेमाच्या एका सीनमध्ये जया बच्चन यांना रडायचं होतं. सांगायचं झालं तर, सिनेमात रडण्याचा सीन असेल तर, कलाकार ग्लिसरीनचा वापर करतात. अशात रडण्याचा सीन असल्यामुळे जया बच्चन यांनी देखील ग्लिसरीनची मागणी केली.

जया बच्चन यांनी ग्लिसरीनची मागणी केल्यानंतर सेटवरील एक व्यक्ती म्हणाला, ‘तुम्ही उत्तम अभिनेत्री आहात, तुम्हाला ग्लिसरीनची काय गरज…’ यावर जया बच्चन यांनी दिलेलं उत्तर आजही चर्चेत आहे. तेव्हा जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘एवढी रडली आहे की आता रडण्यासाठी अश्रू शिल्लक नाहीत..’ जया बच्चन यांच्या उत्तराने चाहते हैराण झाले होते.

जया बच्चन कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकताच जया बच्चन ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या होत्या. सिनेमात त्यांनी अभिनेता रणबीर सिंग यांच्या आजीच्या भूमिकेला न्याय दिला होता. सिनेमात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;