लंकेचा विजयकांत हैदराबाद संघात दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या सुरू असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये लंकेचा फिरकी गोलंदाज विजयकांत वियासकांतचा समावेश करण्यात आला आहे. या संघातील लंकन खेळाडू हसरंगा दुखापतीने त्रस्त झाल्याने त्याच्या जागी विजयकांतला घेण्यात आले आहे.

22 वर्षीय विजयकांत हा लंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज असून, त्याने आतापर्यंत केवळ एका टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण त्याला आता हैदराबाद संघाने थेट बदली खेळाडू म्हणून प्रवेश दिला आहे. हैदराबाद संघाने विजयकांतला 50 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. हैदराबाद संघाने लंकेच्या हसरंगाला या स्पर्धेसाठी मोठ्या रकमेवर खरेदी केले होते.  गेल्यावर्षी हैदराबादने हसरंगाला 1.5 कोटी रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;