केंद्रीय तपास यंत्रणांच्या दडपशाहीविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनात आपही उतरले

केंद्रीय तपास यंत्रणांच्या दडपशाहीविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनात आपही उतरले

मोदी सरकारच्या इशाऱयावर विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करणाऱया केंद्रीय तपास यंत्रणांच्या दडपशाहीविरोधात उडालेला भडका कायम आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि आमदार यांनी आज 18 तासांनंतरही तपास यंत्रणांविरोधात निदर्शने केली. आज मंदिर मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले. आम आदमी पक्षानेही तृणमूल काँग्रेसच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

निवडणूक आयोगाने ईडी, सीबीआय, एनआयए आणि इन्कम टॅक्सच्या संचालकांना तत्काळ हटवावे, अशी टीएमसी खासदार आणि आमदारांची मागणी आहे. दिल्ली सरकारचे मंत्री आणि आप नेते सौरभ भारद्वाज यांनी आज मंदिर मार्ग पोलिस स्टेशन गाठले आणि टीएमसी नेत्यांशी चर्चा केली. निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र, विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;