मुलासाठी मंत्री विखे नगरमध्ये तळ ठोकून

मुलासाठी मंत्री विखे नगरमध्ये तळ ठोकून

नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या असून दुसरीकडे मात्र आपल्या मुलाच्या प्रचारासाठी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे नगरमध्ये तळ ठोकून आहे. एकमेकांचे पक्ष अंतर्गत रुसवेफुगवे काढले जात आहे. त्यामध्ये म्हणावी अशी सफलता येत नाही अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने सुजय विखे यांना उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिलेली आहे. सध्या तरी हे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय वातावरण हे चांगले ढवळून निघायला सुरुवात झालेली आहे. मागील आठवड्यापासून लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा ही नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू केली, त्यांनी केलेल्या यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद सर्व गावातून व तालुक्याच्या शहरातून हा मिळू लागलेला आहे. अनेक जणांनी त्यांच्याशी थेट संपर्क करून आपापल्या गावातील आपापल्या मतदारसंघातील विषय सुद्धा त्यांनी सांगण्यास सुरुवात केलेली आहे. या मतदारसंघांमध्ये विकास झालेला नाही अशी ओरड सुद्धा अनेकांनी त्यांच्यासमोर मांडली. ग्रामीण भागामध्ये आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही तर दुसरीकडे जी आश्वासनं विखे यांनी दिली ती यांनी पाळली नाही अशी जाहीर टीका का होऊ लागलेली आहे.

एवढे सगळे असताना दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे. विखे यांना उमेदवारी मिळेल की नाही याची पक्षांमध्ये उलट सुलट चर्चा होती, तिकीट मिळाल्यानंतर भाजपाचे आमदार राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांना त्यांच्या घरी जावे लागले. प्रदेश सदस्य भानुदास बेरड हे सुद्धा नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. शिंदे त्यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा करून मार्ग न निघाल्यामुळे अखेरीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई इथल्या निवासस्थानी जाऊन बैठक घ्यावी लागली व जो काही तक्रारींचा पाढा आहे, तो राम शिंदे यांनी त्या ठिकाणी वाचून दाखवला व कशा पद्धतीने भाजपाचे या नगर दक्षिणमध्ये नुकसान झालेले आहे. हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिले व त्यामध्ये सामान्य भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तोडगा काढला व आमदार शिंदे यांची नाराजी दूर झाली व एकत्रितपणे आता बैठका घेऊ लागले एवढे असताना दुसरीकडे मात्र कार्यकर्ते हे नेत्यांसमोर आपल्या नाराज असून जाहीरपणे बोलून दाखवत आहे.

त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराच्या अडचणी या दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा वाढत चाललेल्या आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता निवडून द्यायचे असेल तर अनेकांची नाराजी दूर करावी लागणार आहे, म्हणून मंत्री विखे नगर शहरांमध्ये येऊन सातत्याने बैठका तसेच भेटीगाठीसत्राचे आयोजन सुरू केलेले आहे एवढे होत असताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत असलेली नाराजी ही काही कमी व्हायला तयार नाही जे कोणी नाराज आहेत त्यांचे मनधरणी ही करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे. तर दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये नाराजी ही विशेष मध्ये असल्याचे जाहीरपणे अशी बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे आता पक्षासमोर सुद्धा मोठा पेच या सर्व बाबींमुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आता झालेली चूक सुधारून येणार नाही पण दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांनी आता थेट बोलण्यास सुरुवात केल्यामुळे पदाधिकाऱ्यांची चांगलीच नाकीनवं झालेली आहे.

गेल्या दोन दिवसापासून मंत्री राधाकृष्ण विखे हे आपल्या पुत्रासाठी नगर शहरांमध्ये तळ ठोकून आहेत लगातार त्यांचे बैठकांचे सत्र सुरू आहेत चार चार पाच पाच बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याचं काम ते करत आहे, पण दुसरीकडे आजही विखेबद्दलची नाराजी ती काही नगर शहरात काय नगर जिल्ह्यामध्ये आता कमी झालीं असे दिसून येत नाही त्यामुळे आगामी काळामध्ये त्याचा फटका भाजप महायुतीला बसणार हे जवळपास निश्चित झालेले आहे.

त्यासाठी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहे, पण दुसरीकडे त्यांना महाविकास आघाडीचे निलेश लंके यांचे आव्हान असल्यामुळे आगामी काळामध्ये ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये असल्याचे दिसून आलेले आहे. पण दुसरीकडे मात्र आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना आपल्या मुलाच्या प्रचारासाठी होत असलेली दुरवस्था पाहता आपण यामध्ये कशा पद्धतीने सांगड घालू शकतो, तसेच कोणाकोणाची नाराजी आपल्याला दूर करता येईल या दृष्टीकोनातून गेल्या दोन दिवसापासून त्यांनी बैठकांचा सपाटात सुरू ठेवलेला आहे. एवढे होत असताना देखील आणि जगजाहीरपणे आपली नाराजी ते आता बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आता भाजपा महायुतीची डोकेदुखी ही अशा उमेदवारीमुळे वाढली आहे असे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;