वाढती महागाई लक्षात घेत रत्नागिरीत निवडणूक कार्यालयाचे नवे दरपत्रक जाहीर

वाढती महागाई लक्षात घेत रत्नागिरीत निवडणूक कार्यालयाचे नवे दरपत्रक जाहीर

लोकसभा निवडणूकीत उमेदवार आणि पक्षाकडून होणाऱ्या खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून असतो. उमेदवाराच्या खर्चाचे मोजमाप होण्यासाठी तसेच वाढती महागाई लक्षात घेऊन रत्नागिरी निवडणूक कार्यालयाने नवे दरपत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाचा वडापाव 15 रुपये, साधा चहा 10 रुपये तर स्पेशल चहा 15 रुपये, चिकन थाळी 160 तर मटण थाळी 230 रुपये आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वीच रत्नागिरी निवडणूक अधिकारी कार्यालयाने आपले दरपत्रक जाहीर केले आहे. लोकसभा लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा 95 लाख रुपये आहे. हा खर्च दाखवताना निवडणूक आयोगाच्या दरपत्रकाप्रमाणेच त्याला हिशोब द्यावा लागणार आहे. निवडणूकीच्या काळात लागणाऱ्या सर्व वस्तूंचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये वाहनांचे भाड्याचे दर 24 तासांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये इंधनासह किंवा इंधनाविरहित अशा प्रकारचे दर निश्चित करण्यात आले आहेत. रिक्षापासून टॅम्पो, बोलेरो. इनोव्हा, मारुती व्हॅन, ट्रक आणि लक्झरीपर्यंतच्या वाहनापर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. रिक्षाचे भाडे 24 तासासाठी 1,300 रुपये आहे तर इनोव्हाचे भाडे 24 तासांसाठी 4,800 रुपये आहे. लक्झरी बसचे भाडे 24 तासांसाठी 5 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

रत्नागिरी निवडणूक अधिकाऱ्यांनी खाद्यपदार्थांचे दर निश्चित केले आहेत. शाकाहारी जेवणामध्ये साधी थाळी 100 रुपये, स्पेशल थाळी 130 रुपये, व्हेज पुलाव 60 रुपये, व्हेज बिर्याणी 65 रुपये, मांसाहारी थाळीमध्ये अंडाकरी थाळी 100 रुपये, चिकन थाळी 160 रुपये, मटण थाळी 230 रुपये, मच्छी थाळी 190 रुपये, अंडा बिर्याणी 120 रुपये, चिकन बिर्याणी 130 रुपये. नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा 25 रुपये, वडा आणि पॅटीस 15 रुपये, कोल्ड्रींक्स 20 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर झेंडे, स्पीकर, बिल्ले, मफलर, बॅनर, पोस्टर, व्हिडीओ कॅमेरा, एलईडी स्क्रीन, लॅपटॉप, जनरेटर, एअरकुलर, हॅलोजन, ड्रोन कॅमेरा, मंडप आणि स्टेजवर येणाऱ्या सर्व साहित्यापासून अगदी बॉलपेन आणि पेपरचेही दर निश्चित करण्यात आले आहेत. मेणबत्ती, कात्री, स्केचपेन, स्टीलपट्टीचे दरही दरपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. 1 हजार फटाक्यांची माळ 300 रुपये तर 10 हजार फटाक्यांची माळ अडीच हजार रुपये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;