यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका.

उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना सूर्य आग ओकतोय. गर्मीने नागरिक पुरते हैराण झाले आहे.असे असताना यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस आलाय. जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे तापमान मागील आठवड्यापासून 40 अंश सेलसियसच्या समोर पोहचलेला असताना आज संध्याकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक विजेच्या कडकडाटासह बरसलेल्या अवकाळी पाऊसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना बारसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने यवतमाळकरांना दिलासा मिळाला.पावसाचे कोणतेही लक्षण नव्हते मात्र विजेच्या कड -कडाटासह अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे.या पावसामुळे आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;