हरिश्चंद्रगडावर भटकंतीवर आलेल्या मुंबईतील तरुणीचा कोकणकड्यावरून पडून मृत्यू

हरिश्चंद्रगडावर भटकंतीवर आलेल्या मुंबईतील तरुणीचा कोकणकड्यावरून पडून मृत्यू

अकोले तालुक्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यातील हरिश्चंद्रगड शिखराच्या परिसरातील धोकादायक कोकणकड्यावरून खोल दरीत पडून मुंबईतील 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (7 एप्रिल) दुपारच्या सुमारास घडली. अवनी मावजी भानुशाली (वय 22) असे त्या मुलीचे नाव असून ती मुहे.

मुंबईतील घाटकोपर येथील अविवाहित तरुणी अवनी मावजी भानुशाली (वय 22) ही रविवारी 7 एप्रिलला पर्यटक म्हणून हरिश्चंद्रगडावर भटकंतीवर आली होती. रविवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास ती फिरत हरिश्चंद्रगडाजवळच असलेल्या धोकादायक कोकणकडा परिसरात आली. यावेळेस ती कोकणकड्यावरून खोल दरीत पडल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. या तरुणीचा कोकणकड्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला की, तरूणीने स्वतःच कोकणकड्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली ? याचा तपास सुरू आहे. स्थानिक नागरिक व वनकर्मचाऱ्यांनी दुर्घटनेची माहिती वनाधिकारी व राजूर पोलिसांनी दिली. माहीती मिळताच राजूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे व पोहेकॉ व्ही. के. मुंढे यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून कोकणकड्यातून मृत युवतीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. राजूर पोलीसांनी सदर घटनेची माहीती तरूणीच्या कुटुंबियांस कळविली. माहिती मिळताच मृत तरुणीच्या कुटुंबियांनी राजूर गाठले. याबाबत तरुणीचे वडील मावजी जेठालाल भानुशाली काहीतरी तणावातून अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडावर आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;