Lok Sabha Election 2024 : मिंध्यांचा भाजप प्रवेश…! शिवसेना पळवणाऱ्या शिंदेना नेटकऱ्यांनी धू धू धुतलं
शिवसेनेशी गद्दारी करून नाव व पक्ष चिन्ह चोरणाऱ्या मिंधेचा खरा चेहरा जगासमोर उघडा झाला आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये भाजपचाच जोर अधिक असल्यामुळे मिंधेना त्यांचे तीन उमेदवार बदलावे लागले आहेत. त्यामुळे मिंधे गटाची पंचाईत झाली होती. आतातर मात्र भाजपच्या दहशतीत वावरणाऱ्या मिंधेंनी चक्क भाजपचा कमळ चिन्ह असलेला शेलाच गळ्यात घातला आहे, असे चित्र पाहायला मिळालं. त्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आधीच संतापलेल्या महाराष्ट्रातील जनतेनं सोशल मीडियावर अक्षरश: मिंधे गटाला अक्षरश: तुडव तुडव तुडवले आहे. आम्हीच ओरिजनल शिवसेना असे भंपक दावे करणाऱ्या मिंधेची लाचारी जाहीर दिसत असल्याची टीका सोशल मीडियावरून होत आहे. चंद्रपूरातील सभेनंतर हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत, अशा आशयाच्या प्रतिक्रीया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
सोमवारी चंद्रपूर येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली होती. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते मात्र सभेच्या वेळी शिंदे यांना ते कोणत्या गटाचे नेतृत्व करतात याचाच विसर पडल्याचे दिसून आले. त्यांनी चक्क भाजपचे कमळ चिन्ह असलेला शेला अंगावर घेतला होता. या सभेला आऱपीआय अध्यक्ष रामदास आठवले देखील होते. मात्र त्यांनी कोणताही शेला ओढला नव्हता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे लवकरच भाजप प्रवेश करणार की काय अशी टीका नेटकरी करत आहेत.

शिवसेना व भाजपची 25 वर्ष युती होती. या युतीत शिवसेना प्रमुख हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कधीच कमळाबाईची पालखी वाहणार नाही असे म्हटले होते. शिवसेनेचा नेता असो किंवा कार्यकर्ता कुणीच भाजपची माळ गळ्यात घातल्याचे दिसून आलेले नाही. मात्र इथे मिंधे थेट भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओ वरून सध्या नेटकरी एकनाथ शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे. काहींनी मिंधे गट भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी मिंधेंची हीच लायकी, गद्दार, पक्षचोर अशा शब्दात टीका केली आहे.
भाजपाळलेले मिंधे, मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा; शिवसेनेची टीका
शिवसेनेने त्यांच्या अधिकृत एक्स पेजवर या सभेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे यांच्या गळात भाजपचा शेला दिसून येत आहे. त्यावरून शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केला. ”मुख्यमंत्री तोतया शिवसेनेचा, गळ्यात पट्टा भाजपाचा”, असा टोला शिवेसनेने लगावला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List