बायोगॅसच्या विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू, तर एक गंभीर
नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात येथील एका शेतकऱ्याने बायोगॅससाठी जुन्या विहिरीचा वापर केला होता. त्या विहिरीत शेणाची स्लरी तयार करण्यात आली होती. सदर विहिरीत एक मांजर पडले म्हणून एक मुलगा काढण्यास गेला असता तो बुडाला. त्या मुलाला काढण्याकरता दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे सहा लोक उतरले होते. त्यातील पाच लोकांचा जागेवर गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेतील सहावा इसम विजय माणिक काळे बेशुद्ध अवस्थेत नगर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे. ही घटना सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली.
माणिकराव गोविंद काळे (65), संदीप माणिक काळे (36), अनिल बापूराव काळे (58), विशाल अनिल काळे (23), बाबासाहेब पवार (35) अशी मृतांची नावं आहेत. जनावराच्या शेणाचा शोषखड्डा विहिरीमध्ये बनवला गेला होता. त्यामध्ये हे सहा जण अडकले होते. या घटनेने नेवासा तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या ठिकाणी गावातील पोलीस पाटील नेवासा पोलीसचे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, तसेच या भागातील नेते विठ्ठल रावजी लंघे, तसेच आधी नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित ही घटना एन गुढीपाडव्याच्या दिवशी घडल्याने परिसरामध्ये मोठे दुःख व्यक्त केले जात आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List