केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीची तपासणी होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीची तपासणी होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

Lok Sabha Election 2024 – केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने दिलेल्या तक्रारीनंतर हे आदेश देण्यात आले आहेत. या मंत्र्याचं नाव राजीव चंद्रशेखर असं आहे.

राजीव चंद्रशेखर हे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे मंत्री असून सध्या ते तिरुवनंतपुरम मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवणार आहेत. चंद्रशेखर यांनी त्यांच्या संपत्तीविषयी जी माहिती दिली आहे, त्यात आणि प्रत्यक्षात तफावत असल्याची तक्रार काँग्रेसतर्फे करण्यात आली होती.

त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 2021-22 या आर्थिक वर्षांत त्यांचं उत्पन्न फक्त 680 रुपये इतकंच आहे. पण त्यापूर्वीच्या आणि 22-23 या आर्थिक वर्षांत मात्र 17.5 लाख आणि 5.50 लाख असं दाखवण्यात आलं आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे चंद्रशेखर यांनी 28 कोटी रुपये इतकी संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. त्यात रोकड, बँकेतील ठेवी, बिगर बँक आर्थिक कंपन्या तसंच सहकारी समितींमधील भागीदारी, गुंतवणूक रोखे आणि तत्सम गुंतवणूक देण्यात आली आहे.

मात्र, हे सगळंच चक्रावणारं असल्याची तक्रार काँग्रेस तर्फे करण्यात आली आणि त्यांच्या संपत्तीची तपासणी करण्याची मागणीही आयोगाकडे आली होती. त्यानुसार आयोगाने तपासणीचे आदेश दिले आहेत. जर ही माहिती चुकीची आढळली तर सहा महिने कैद किंवा दंड अशा शिक्षेचं प्रावधान करण्यात आलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;